औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुक जसजशी जवळ येत आहे तसे वारे वाहू लागले आहे. अनेक पक्षांनी वेगवेगळ्याप्रकारे तयारीला लागले आहेत. मात्र याच दरम्यान भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. तनवाणी यांच्यासोबत भाजपचे सात ते आठ नगरसेवक फुटण्याची शक्यता आहे.असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. यामुळे आता औरंगाबादचा शिवसेनेचा गड अजूनच भक्कम होणार आहे.
औरंगाबाद महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. शहरात निवडणुकांचे वारे वाहत आहे. स्थानिक कार्यकर्ते निवडणुकांच्या तयारीत आहेत. याच काळात भाजपला मोठा धक्का बसणार आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ते औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तनवाणी आणि गजानन बरवाल आज ‘मातोश्री’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर तनवाणी हाती शिवबंधन बांधतील असे बोलले जात आहे.